Menu
  • Navnath Bhaktisar Adhyay 40

Total Download Size - 5.40MB


Language - Marathi


Navnath Bhaktisaar Adhyay 40 is considered to be the most important Adhyay as it is a summary of all the other Adhyay in this book. It is considered that person who is not able to do the recitation of the entire Navnath Baktisar can do the recitation of 40th Adhyay and still can get the same outcome if it is done with the complete faith. That is the reason Adhyay 40 is considered to be most important of all .


   श्रीनवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय, प्रासादिक परमपावन आणि अदभूत असा ग्रंथ आहे . या ग्रंथामध्ये नाथपंथातील सर्व अवतारांचे वर्णन केले आहे . नाथ संप्रदायमधील नऊ विभूती म्हणजे नवनारायणांनी श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून कलीयुगात घेतलेले अवतार आहेत अशी भक्तांची मान्यता आहे . दत्त व शैव संप्रदाय यांच्याशी या संप्रदायाचे अतुट नाते आहे. भक्तिभावाने या ग्रंथाचा पाठ करणाऱ्या वा श्रवण करणाऱ्या व्यक्तिंना लैकिक व पारमार्थिक असे दोन्ही लाभ मिळतात असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे. या सद् ग्रंथांची महती व योग्यता यामुळे या ग्रंथाची पारायणे घरोघरी होत असतात. 

       श्रीनवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण भक्तिभावाने केल्यास या ग्रंथातच सांगिंतल्याप्रमाणे फलश्रुती होते असा अनुभव अनेक भाविक भक्तांनी घेतला आहे. याचे वाचन  अथवा पारायण काही कारणामुळे ज्या भक्तांना करता येत नाही त्यांना श्रवण माध्यमातून हा ग्रंथाचे मनन व परिशीलन करता  यावे या दृष्टीने हे ध्वनिमुद्रण अतिशय सोईचे  व तितकेच लाभदायी ठरेल असा विश्वास वाटतो . 

                ज्यांना श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्यांनाही या पारायणाचे सर्वमान्य नियम व अटी पाळून वाचन करीत असताना या ध्वनिमुद्रणाचे सहाय्य घेता येऊ शकेल . यादृष्टीने पारायणाच्या प्रत्येक दिवशीचे ठराविक अध्याय असलेली एक अशा सप्ताहाच्या सात साडींचा संच श्रीनवनाथभक्तांच्या हाती देताना आम्ह्यस अतिशय आनंद होत आहे.   

    शुद्धता स्पष्टता  व सात्विकता  सांभाळून ग्रंथवाचनाचा प्रयत्न केला आहे . तरीसुद्धा या  आमच्या प्रयत्नांना काही त्रुटी आढळल्यास मोठ्या मनाने श्रीनवनाथभक्त आम्ह्यस निदर्शनास आणून देतील व आमच्या अनवधानाने राहिलेल्या त्रुटी मोठया मनाने पदरात घेतील ही श्रीनवनाथ भक्तांकडून सादर सविनय अपेक्षा . Write a review

Please login or register to review

Navnath Bhaktisar Adhyay 40

  • Product Code: SO-AB-14-03
  • Availability: In Stock
navnath bhaktisaar adhyay 40

  • Rs. 100

  • Ex Tax: Rs. 85